Biplab Kumar Deb
Biplab Kumar DebTeam Lokshahi

भाजप पक्षश्रेष्ठीच्या आदेशानंतर त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

शुक्रवारी दिल्लीत घेतली होती अमित शहा यांची भेट
Published by :
Team Lokshahi
Published on

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव (biplab deb)यांनी शनिवारी राजीनामा दिला. ते भाजप, इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (bjp IPFT) सरकारचे नेतृत्व करत होते. राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानंतर राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी बिप्लब देव यांनी गृहमंत्री अमित शहा (amit shah)यांची भेट घेतली होती. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

Biplab Kumar Deb
केतकी चितळेवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल, आता गृहमंत्री म्हणाले...

राज्यात आठ महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहेत. वास्तविक भाजपने त्रिपुरामध्ये नेतृत्व बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 पूर्वी राज्यातील हा मोठा निर्णय मानला जात आहे. बिप्लब देव यांनी कालच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. बैठकीत त्यांना पद सोडण्यास सांगण्यात आले. बिप्लब देव म्हणाले की, राज्यात 2023 च्या निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. पक्षाचा क्रम सर्वोपरि आहे.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आगरतळा येथे पोहोचले आहेत. सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या राज्य विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय होणार आहे.

का दिला राजीनामा

त्रिपुरा भाजप संघटनेत बिप्लव देब यांच्याबाबत नाराजी आहे. यामुळेच दोन आमदारांनीही पक्ष सोडला होता, असं सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही. राज्यात पुढील वर्षी 2023 मध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com