Vardha Crime News
Vardha Crime NewsTeam Lokshahi

लग्नाचं आमिष दाखवून केले अत्याचार; वर्ध्यात पोलीस निरीक्षकार गुन्हा दाखल

Vardha : पोलीस निरीक्षकानं केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे लोकांमध्ये संताप
Published by :
Sudhir Kakde
Published on

वर्धा | भूपेश बारंगे : वर्ध्यातील वडणेर पोलीस (Police) ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटेवर ब्रम्हपुरी (Bramhapuri) पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

Vardha Crime News
ठाण्यात पोलिसांवर मोठी कारवाई; कोट्यवधींची लाच मागणारे 3 अधिकारी 7 कर्मचारी निलंबित

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात 15 वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना तेथील एका महिलेशी ओळख पटली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झाले. प्रेमविवाह करण्याचे पीडितेला आमिष दाखवून संबंध प्रस्थापित करायचा. राजेंद्र शेटे हे अनेक ठाण्यात कार्यरत होते. याच दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून महिलेवर अत्याचार केला. अशी फिर्याद महिलेनं दिली असून, तिच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. पीडित महिलेने लग्नाची गळ घालत असताना पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे हा आपल्या पदाची दादागिरी दाखवत पीडितेला मारहाण करायचा.

Vardha Crime News
Uttar Pradesh Accident : यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू, २ गंभीर
Vardha Crime News
मंदिर-मशिदचे तीन वाद : एकाच दिवसांत तीन कोर्टाचे निकाल

आरोपी राजेंद्र शेटे याने पीडित महिलेला 30 मार्च 2022 ला नागभीड तालुक्यातील घोडझरी येथे भेटायला बोलावले होते. दरम्यान, पीडित महिलेने लग्नाबद्दल विचारले असता तिच्याशी भांडण करून आरोपी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे ह्याने मारहाण केली. त्यामुळे पीडित महिलेने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटेला अटक करण्यात आली नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com