Rajya Sabha Elections
Rajya Sabha ElectionsTeam Lokshahi

Rajya Sabha Elections : राज्यसभा निवडणुकांची तारीख जाहीर; 6 राज्यांतील 57 जागांवर होणार निवडणूक

Published by :
Sudhir Kakde
Published on

दिल्ली : राज्यसभेच्या (Rajya Sabha Elections) 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने (Election Commission of India) गुरुवारी केली. 15 राज्यांमधून निवडून आलेल्या राज्य सभेच्या 57 सदस्यांचा कार्यकाळ जून-ऑगस्ट 2022 दरम्यान संपणार आहे. 10 जून रोजी निवडणूक होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

Rajya Sabha Elections
Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी फडणवीस मध्यस्ती करतील - मुनगंटीवार

15 राज्यांमध्ये असलेल्या राज्यसभेच्या 52 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सर्वाधिक 11 जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. प्रत्येक राज्यात प्रत्येकी सहा जागांसाठी निवडणूक होत आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देशभरात राजकीय घुसळन होणार हे निश्चित.

Rajya Sabha Elections
Sambhaji Raje भाजपची साथ सोडत संभाजी राजेंनी राज्यसभेचे असे मांडले गणित

दरम्यान, गेल्या महिन्यात, द्वैवार्षिक निवडणुकांनंतर संसदेच्या वरच्या सभागृहात भाजपने 100 चा आकडा पार केला, 1990 हा आकडा पार करणारा पहिला पक्ष ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com