Alcohol
AlcoholTeam Lokshahi

दोन बॉटल प्यायली तरी दारु चढेना; महाशयांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

Published by :
Team Lokshahi
Published on

उत्तर प्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी असलेल्या 42 वर्षीय व्यक्तीने अधिकाऱ्यांकडे एक अजब तक्रार केली आहे. तो मद्य प्यायल्यानंतरही नशा न झाल्यामुळे त्याने ही तक्रार केली आहे. दुकानातून घेतलेली दारु ही भेसळयुक्त होती अशी शंका या व्यक्तीला आहे. या तक्रारीनंतर येथील उत्पादन शुल्क आयुक्तांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून त्यानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे.

Alcohol
"राज ठाकरे सैन्य घेऊन आले तरी अयोध्येत येऊ देणार नाही, कुणीही मायेचा लाल..."

उज्जैनच्या बहादूरगंज भागातील रहिवासी असलेल्या लोकेश सोठिया यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्यांनी १२ एप्रिल रोजी एका दुकानातून देशी दारूच्या चार सीलबंद बाटल्या (पावा) खरेदी केल्या होत्या. "मी आणि माझा मित्र त्या दोन बाटल्यांमधून (प्रत्येकी 180 मिली) दारू प्यायलो, पण मला नशा चढली नाही," असं सोथिया म्हणाले. सोथिया हे एका पार्किंगमध्ये काम करतात. बाटल्यांमध्ये अल्कोहोलमिश्रित पाणी असल्याचा दावा त्यांनी केला.

Alcohol
एकतर्फी प्रेमात अपयश, तरुणाने बदला घेण्यासाठी लावली आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

सोथिया म्हणाले, 'मी अजून दोन बाटल्यांचं सील उघडलेलं नाही आणि आवश्यक असेल तेव्हा ते पुरावे म्हणून सादर करेन. खाद्यपदार्थ, तेल आणि इतर गोष्टींमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या नेहमीच समोर येतात. मात्र आता दारूमध्येही भेसळ होतेय. हे योग्य नाही. मी ग्राहक मंचात जाईन. गेल्या दोन दशकांपासून आपण दारूचे सेवन करत असून त्याची चव आणि दर्जा आपल्याला चांगलाच ठाऊक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com