Chardham Yatra 2022 : कोरोना संकटानंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले,भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण
कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर बद्रीनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजे उघडले आहेत. भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बद्रिनाथ (Badrinath Dham) परिसरामध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
राज्य सरकारनं आधीच निर्णय घेतला होता की, एका दिवसांत केवळ 12 हजार भाविक केदारनाथ आणि 15 हजार बद्रीनाथला भेट देऊ शकतील. आज सकाळपासूनच बद्रीनाथ धाममध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
दर्शनासाठी पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून काल सर्व तयारी पूर्ण झाली होती. अशातच आज सकाळी 6 वाजता बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले.
दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी सायंकाळी 6.15 वाजता धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी भाविकांसाठी खुले करण्यात आले.