Meteorological Department
Meteorological DepartmentTeam Lokshahi

मे महिन्यात महाराष्ट्राला उकाड्यापासून दिलासा, हवामान खात्याने वर्तवला अंदाज...

उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात एप्रिलमध्ये १२२ वर्षांचा विक्रम मोडला गेला.
Published by :
Saurabh Gondhali
Published on

भारतात सध्या प्रचंड उष्णता आहे. उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात एप्रिलमध्ये १२२ वर्षांचा विक्रम मोडला गेला. येथील सरासरी कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस आणि ३७.७८ अंश सेल्सिअसवर पोहोचले. अशात मे महिन्यात महाराष्ट्रासह (Maharashtra) देशाच्या मध्य (Central), पूर्व आणि दक्षिण भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) (आयएमडी) वर्तवला आहे. या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, रात्रीचे तापमान (Temperature) सरासरीपेक्षा जास्त राहू शकते, असे 'आयएमडी'च्या अंदाजात म्हटले आहे.

Meteorological Department
‘या’ जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट; हवामान खात्याचा अंदाज

राजधानी दिल्लीसह उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताला सोमवारपासून उष्णतेपासून (summer) दिलासा मिळू शकतो. दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ढगाळ वातावरण (Cloudy weather) असेल. येथील नागरिकांना उष्णतेची लाट आणि कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच तीन मेपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि पश्चिम राजस्थानमध्ये कमी उष्मा राहील, असा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.

Meteorological Department
पावसाळ्याची सुरवात झाल्याने तोरणमाळचे वातावरण अतिशय अल्हाददायक

एप्रिल २०१० मध्ये वायव्य भारतात सरासरी तापमान (summer) ३५.४ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. त्यापूर्वी १९७३ मध्ये ३७.७५ अंशांची नोंद झाली होती. शास्त्रज्ञांनी हवामान बदलाबाबत इशारा दिला आहे. या प्रदेशातील वाढत्या तापमानाचा एक अब्ज लोकांवर परिणाम होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com