नवाब मलिक कारागृहात कोसळले, प्रकृती गंभीर
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik)यांची प्रकृती गंभीर (serious condition)आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात आहेत. मलिक यांच्या वकिलांनी ही माहिती न्यायालयात दिली. यावेळी न्यायालयाने कारागृह अधीक्षकांनी ही माहिती का दिली नाही? असा प्रश्न न्यायालयाने विचारला.
नवाब मलिक गेल्या तीन दिवसांपासून आजारी होते. तसेच ते कारागृहात कोसळले. यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्या प्रकृतीचे कारण देत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली. मात्र ईडीने जे.जे. रुग्णालयाच्या अहवाल आल्याशिवाय त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यास नकार दिला.
नवाब मलिकांना का झाली अटक
महाराष्ट्र सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी सक्तवसुली संचालनालय अटक केली होती. या कारवाईने राज्यात खळबळ उडाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली होती. लँड डीलशी संबंधित हे प्रकरण असून टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. हे सर्व आरोप मलिक यांनी अमान्य केले असून ईडीची कारवाईच बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर भाजपने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.