धर्मांधांच्या डोळ्यात अंजन; 55 वर्षांपासून हिंदू आजीबाई ठेवतात रोजे
बुलडाणा | संदीप शुक्ला : राज्यात एकीकडे भोंगे, हनुमान चालिसामूळे (Hanuman Chalisa) हिंदू मुस्लीममध्ये वातावरण तणावपूर्ण असताना दुसरी कडे बुलडाणा (Buldana) जिल्ह्याच्या मेहकर येथे 95 वर्षीय श्रीमती कुसुमबाई दीक्षित या हिंदू आजीबाईंची एक वेगळीच कथा समोर आली आहे. गेल्या 55 वर्षांपासून या आजीबाई रोजे ठेवतात. 95 वर्षीय आजीबाई धर्माच्या नावाने विद्वेष पसरवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर (Mehkar) शहरातील सराफा लाइन मधील राजपूत गल्लीत राहणाऱ्या 95 वर्षीय श्रीमती कुसुमबाई दिक्षित आजी यांनी मागील 55 वर्षांपासून न चुकता पवित्र रमज़ान महिन्यातिल शेवटचे ज्यांना मोठे रोजे (उपवास) म्हंटल्या जाते असे रोजे(उपवास) दिक्षित आजी अखंडपणे ठेवत आली आहे.
आपल्या सर्वधर्म समभाव कृतीतून दिक्षित आजी राजकारण्यांना आणि धार्मिक तेढ पसरवू पहाणाऱ्यांना फार मोठा संदेश देऊन जातात. दिक्षित आजीचे चिरंजीव व्यवसायिक श्याम दिक्षितही आपल्या आईच्या या कार्यात त्यांना सहकार्य करतात. सकाळी उठून ते व त्यांची पत्नी हे रोजा ठेवण्यासाठी आईची व्यवस्था करतात. 95 वर्षीय आजीच्या रोजे ठेवण्याची कुतूहलाने शहरात चर्चा होत आहे.
विशेष म्हणजे आजीबाई 12 महीन्यातुन उपवास करतात. तर त्या 4 महीने, मौन व्रत करीत असतात. वयाच्या 20 वर्षांपासून केवळ एक वेळ जेवण त्या करीत आहेत. या अनोख्या आजीबाई संपूर्ण परिसरात प्रेरणादायी आणि नवा आदर्श ठरत आहेत.