"राष्ट्रवादीसोबत युती न करणं, ही आमची चूक..."; सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य चर्चेत
चंद्रपूर | अनिल ठाकरे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. 2019 निवडणुकीनंतर भाजपला (BJP) शह देत शिवसेनेने (Shivsena) महाविकास आघाडी (MVA) सोबत सरकार स्थापण केलं. 105 आमदार असुनही भाजपला (BJP) सत्तास्थापण करत आली नाही. त्यामुळे एकीकडे भाजप आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्या गेल्या 3 वर्षांपासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच मुद्दयावरून आता सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी एक वक्तव्य केलं आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हतं. त्यामुळे भाजपमध्ये एक विचार असा होता, जो राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याच्या बाजूचा होता. मात्र त्यासाठी मित्रपक्ष आणि विचारसाम्य असलेली शिवसेना आपण सोडायची कशी, असा विचार पुढे आला. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा विचार बाजूला सारला गेला. ती आमची चूक होती, असं आता वाटू लागलं असल्याची भावना सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. तसंच या चुकीतून बोध घेत पुढील निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवू, असंही पुढे सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले.
राज्यात सुरु असलेल्या भोंग्याच्या वादावर देखील त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, यूपीमध्ये अनधिकृत भोंगे काढायला सुरुवात झाली. मात्र राज्यात ते काढले जात नाहीत, या राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, नियमानुसार जे करायला पाहिजे, ते करण्याची गरज आहे.
सुधीर मुंगटीवांर जे बोलतात त्याच्या त्यांना पश्चाताप होईल - निलम गोऱ्हे
सुधीर मुंगटीवार यांनी पुड्या सोडने बंद करावे. ते जे बोलतात त्याचा त्यांना भविष्यात पश्चाताप होऊ नये एवढी काळजी त्यांनी घ्यावी असा सल्ला निलम गोऱ्हे यांनी सांगितल आहे. हैद्राबादच भाग्यनगर तुम्ही करू शकता, तर औरंगाबादच संभाजीनगर का करत नाही असा सवाल त्यांनी भारतीय जनाता पक्षाला विचारला आहे.