Bulli Bai App : बुली बाई अॅप प्रकरणातील तीन आरोपींना जामीन
'बुली बाई' (Bulli Bai App ) अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही (photo) अपलोड करण्यात आले होते.
तसेच त्यांच्यावर बोलीही लावली जात होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं (CYBER) ट्विटरला लिहिलं होतं. कारण 'बुली बाई'शी (Bulli Bai App ) संबंधित तीन ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी या अॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी (Mumbai police) 'बुली बाई' अॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते.
आता या प्रकरणात तीन आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या पालकांना शक्य असल्यास त्यांच्या मुलांना सामाजिक वर्तन आणि सोशल मीडियाचा योग्य वापराचे नियम शिकवण्यासाठी समुपदेशन करण्यास सांगितलं आहे. असे न्यायालयाने सांगितले.
यासोबतच न्यायालय म्हणाले की, नीरज बिश्नोई, ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज सिंह यांनी हे प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहेत. त्यांनी अॅप तयार करणे आणि अपलोड करणे आणि माहिती प्रसरवण्याचे काम केले होते. बिश्नोई, ठाकूर आणि नीरज हे वयाने प्रौढ असून त्यांना समज होती, तरीही त्यांनी तीन तरुणांच्या अज्ञानाचा गैरवापर केला.