जितेंद्र आव्हाड यांचे वाझे असलेल्या प्रवीण कलमे यांनी माझ्या विरोधात आरोप केले. ते प्रवीण कलमे कुठे आहेत, याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का? कलमे भारतात आहेत की विदेशात, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे.ठाकरे परिवाराशी व्यावहारिक संबंध असलेल्या हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदींना कुठं लपवलं? किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल केला.
नंदकिशोर चतुर्वेदीच्या कंपन्यांची यादी समोर आली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपनी एकाच पत्तावर रजिस्टर आहेत. ते चतुर्वेदी गायब आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मेहुण्यांच्या कंपन्यांशी संबंध नाहीत, हे जाहीर करावे. आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, श्रीधर पाटणकर यांच्याशी चतुर्वेदीचे व्यवहार समोर आले आहेत.
चतुर्वेतीला फरार घोषित करण्यासाठी प्रयत्नशील होतो. त्यासाठी तीन दिवस मी दिल्लीत होतो. आता चतुर्वेदीला ईडी लवकरच फरार घोषित करणार आहे, असा खुलाशा सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्रीधर पाटणकरांच्या (shridhar patankar) कंपनीला विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी व आदित्य ठाकरे यांच्या तीन कंपन्या आहेत.