बाप्पाच्या विसर्जनसाठी २० हजार पोलिसांचा बंदोबस्त
कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. बाप्पाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर २० हजार पोलिसांना विसर्जन स्थळ व मार्गिकांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळासह मध्य मुंबईतील दादर, लालबाग व परळ परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार समजते.
सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार असून स्थानिक मंडळांना पोलिस दिवसाकाठी तीन ते चार वेळा भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत.विसर्जनासाठी मुंबईत ३२०० अधिकारी, १५ हजार ५०० अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाच्या आठ कंपनी, शीघ्र कृतीदलाची एक कंपनी, फोर्स वनची एक कंपनी, ७५० गृहरक्षक, २५० प्रशिक्षणार्थी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय बाॅम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक यांनाही विविध परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू, मालाड व गणेश घाट परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आली आहे. याशिवाय मुंबईत ७३ नैसर्गिक तलाव, १६२ कृत्रिम तलाव आहेत