दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद; धार्मिक तिर्थस्थळांच्या दानाला फटका बसणार?

दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद; धार्मिक तिर्थस्थळांच्या दानाला फटका बसणार?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजार रुपयांच्या नोटेवर मोठा निर्णय घेतला आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढणार आहे. मात्र, ती कायदेशीर निविदा राहील. आरबीआयने बँकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणे तात्काळ बंद करण्याच्या सल्ला दिला आहे. रिझर्व्ह बँकेने 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या नोटा बँकेतून बदलून घेता येतील.

याच पार्श्वभूमीवर आता मात्र धार्मिक तिर्थस्थळांच्या दानाला फटका बसणार असल्याचे समजते. वेगवेगळ्या तिर्थस्थळांना हजारो भाविक नतमस्तक होत असतात. लाखो - कोट्यावधींचे दान देवाच्या चरणी अपर्ण करत असतात. आता आरबीआयने 2000 च्या नोटा चलनातून बाद केलेल्या आहेत आणि 30 सप्टेंबरपर्यंत बँकेंत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देवाच्या चरणी अपर्ण केलेल्या दानाची मोजणी आठवड्यातून केली जाते. त्यानंतर ते बँकेत जमा केले जाते. मात्र आता आरबीआयने घेतलेल्या निर्णयामुळे आता दानपेटीत किती 2000 हजारच्या नोटा आढळून येतात. याकडे आता लक्ष लागले आहे. त्यामुळे आता दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे धार्मिक तिर्थस्थळांच्या दानाला फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद; धार्मिक तिर्थस्थळांच्या दानाला फटका बसणार?
नोटबंदी 2.0! RBI चा मोठा निर्णय; 2 हजाराची नोट बंद होणार, 'या' तारखेपर्यंत करा बॅंकेत जमा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com