Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 20 दिवसांचे पाणी; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 20 दिवसांचे पाणी; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

उष्णतेची लाट जास्तच वाढत चालली आहे.
Published on

उष्णतेची लाट जास्तच वाढत चालली आहे. यात अजून एक समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 11.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेकडून सरकारला अतिरिक्त पाण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहेमुंबईला मुबलक प्रमाणात पाणी मिळावं यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी मुंबईसाठी द्यावे अशी विनंती केली होती. सध्याचा पाणी साठा पाहता पाटबंधारे विभाग/राज्य सरकार यांनी राखीव साठ्यातून पाणीसाठा मुंबईसाठी मंजूर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com