VIDEO: अमेरिकेत एअर शो दरम्यान भीषण अपघात, दोन विमाने एकमेकांना धडकली
अमेरिकेतील डलास येथे शनिवारी एअर शो दरम्यान दोन विमाने बोईंग बी-17 बॉम्बर आणि एक लहान विमान आकाशात एकमेकांना धडकले. ती दोन्ही विमाने लगेचच जमिनीवर पडली आणि त्याचे रूपांतर आगीत झाले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
माहितीनुसार, अमेरिकन वायुसेनेच्या स्मारक विंग्सच्या डलास येथे आयोजित एअर शो दरम्यान ही दुर्घटना घडली. एफएए आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्डने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
शो मध्ये सहभागी लोकांद्वारे हा व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका मोठे विमान सरळ रेषेत उडत आहे. ते जमिनीपासून खूप उंचावर नाही. असे दिसते. त्याच वेळी एक छोटे विमान आपली दिशा बदलून डाव्या बाजूने येते आणि ते सरळ या मोठ्या विमानावर आदळून त्याचे तुकडे-तुकडे होतात. त्यामुळे मोठे विमान खाली जमिनीवर येऊन स्फोट होऊन त्याचेही तुकडे तुकडे होतात,
दुसऱ्या महायुद्धात जर्मनीविरुद्ध हवाई युद्ध जिंकण्यात चार इंजिन असलेल्या B-17 बॉम्बरने मोठी भूमिका बजावली होती. P-63 Kingcobra हे लढाऊ विमान त्याच युद्धादरम्यान बेल एअरक्राफ्टने विकसित केले होते. सोव्हिएत वायुसेनेनेही त्याचा वापर युद्धात केला.