Illegal Lenders| Dhule Police
Illegal Lenders| Dhule Policeteam lokshahi

धुळ्यातील अवैध सावकारावर धाड, 2 कोटी 47 लाखांची रोकड जप्त

आधीच्या तीन छाप्यात 9 कोटींपेक्षा अधिकची रोकड आणि 6 कोटींचे दागदागिने जप्त
Published by :
Shubham Tate
Published on

धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंब यांच्याकडे पुन्हा एक मोठे घभाळ सापडले आहे. बंब यांच्या तिसऱ्या बँकेच्या लॉकरच्या तपासणीत तब्बल २ कोटी ४७ लाखांची रोकड सापडली आहे. तीन कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या २०४ मुदत ठेवीच्या पावत्या सापडल्या आहेत. सोबतची १०० कोरे धनादेश, ३४ सोन्याची नाणी, २१० सौदा पावत्या आणि खरेदी खतं सापडली आहेत. या कारवाईत विदेशी चलनही सापडले आहे. (2 crore 47 lakh cash seized from illegal lenders in Dhule)

Illegal Lenders| Dhule Police
भाजपला पाठिंबा देणारे दोन अपक्ष महाविकास आघाडीच्या गोटात

चार ते पाच सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये बंबने आपला काळा पैसा मार्गी लावल्याचेही तपासात समोर येत आहे. आधीच्या तीन छाप्यात पोलिसांनी ९ कोटीपेक्षा अधिकची रोकड जप्त केली असून, ६ कोटींचे दागदागिने जप्त केले आहेत. बंब याने कर्ज वाटलेल्या कर्जदारांच्या नावाने परस्पर मुदत ठेवीच्या पावत्या देखील बनवल्याचे उघड झाले आहे. आयकर विभागानेही बंबची चौकशी सुरु केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com