वाढदिवस साजरा करायला वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागात विद्यार्थीनीनं केली आत्महत्या
Team Lokshahi

वाढदिवस साजरा करायला वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागात विद्यार्थीनीनं केली आत्महत्या

मारिया ऊर्फ खुशी अहमद सैय्यद असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

भंडारा | उदय चक्रधर : वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थीनीनं थेट टोकाचं पाऊल उचललं आणि स्वयंपाक खोलीतील लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथील इंदिरानगरात ही घटना घडली आहे. मारिया ऊर्फ खुशी अहमद सैय्यद (19 रा. इंदिरानगर, सिपेवाडा रोड, लाखनी) असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. विद्यार्थीनी लाखनीच्या समर्थ महाविद्यालयात बी. ए. प्रथम वर्षाला शिकत होती.

वाढदिवस साजरा करायला वडिलांनी पैसे न दिल्याच्या रागात विद्यार्थीनीनं केली आत्महत्या
महाराष्ट्रात मागच्या 23 दिवसांत 89 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

विद्यार्थीनी ही आत्महत्या करण्याच्या आधीच्या रात्री वडील, आई व लहान भावासोबत जेवायला बसली होती. त्यावेळी तिने माझा वाढदिवस आहे, मला पैसे हवे आहेत, असं पालकांना सांगितलं. त्यावर वडिलांनी सकाळी कामावर जातो व सायंकाळी केक आणतो, असं सांगितलं. त्यानंतर रात्री सर्वजण झोपी गेले. पहाटे वडील कामाला निघून गेले, लहान भाऊ कवनेल सैय्यद (17) हा नळ फिटिंगच्या कामासाठी नागपूरला गेलाॉ. आई तबसुम अहमद सैय्यद ही सकाळी गोंडमोहल्ला येथील मदरशात शिकवायला गेली. यावेळी मारिया घरी एकटीच होती. वडिलांनी वाढदिवसाला पैसे न दिल्याच्या रागात स्वयंपाक खोलीतील लोखंडी हुकाला ओढणीने गळफास लावून घेतला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. असता तेथे डॉक्टर ने तपासून मृत घोषित केले आहे।या प्रकरणी लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com