Jayakwadi Dam: जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले; 9 हजार 432 क्यूसेसने विसर्ग सुरु

Jayakwadi Dam: जायकवाडीचे 18 दरवाजे उघडले; 9 हजार 432 क्यूसेसने विसर्ग सुरु

नाशिक व नगर भागात झालेल्या जोरदार पावसामुळे 46 दिवसात पैठण येथील जायकवाडी धरण ओव्हरफुल झाले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

सुरेश वायभट | पैठण: नाशिक व नगर भागात झालेल्या जोरदार पावसामुळे 46 दिवसात पैठण येथील जायकवाडी धरण ओव्हरफुल झाले आहे. धरण काठोकाठ भरल्यामुळे मराठवाड्यातील शेतीसिचंनाचा प्रश्न मिटला असून शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.

आज जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे अर्धा फुटवर उचलून 9 हजार 432 क्यूसेस या वेगाने गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे. धरणात पाण्याची आवक वाढली तर विसर्ग देखील वाढला जाईल असे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे. सध्या जायकवाडी धरणात 97.30 ऐवढा जलसाठा उपलब्ध असून 12 हजार क्यूसेस या गतीने पाण्याची आवक सुरू आहे.

गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी पात्र दुथडी भरुन खळखळून वाहत आहे हे दृश्य बघण्यासाठी धरण परीसरात पर्यटकांची गर्दी बघावयास मिळत आहे. पर्यटकांची गर्दी बघता पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी जायकवाडी धरण परीसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. धरण फुल भरल्यामुळे धरणा-पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com