मुलाने गोळी मारल्यावर दहा तास आई जिवंत होती, मुलगा वारंवार पाहून जात होता
उत्तरप्रदेशच्या लखनऊमधून एक 16 वर्षीय मुलाने आपल्याच आईची हत्या केली. केवळ ऑनलाईन गेम खेळण्यासाठी नकार दिल्याने त्याने हत्या केली होती. रात्री 2 वाजता त्याने गोळी मारली होती. परंतु 12 वाजेपर्यंत त्याची आई जिवंत होती. मृत्यूची वाट पाहत होता. आरोपी वारंवार दरवाजा उघडून पाहत होता. त्यानंतर पुन्हा दरवाजा लॉक करत होता.
अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ADCP), काशिम अब्दी यांनी सांगितले की, साधना सिंगची हत्या करणाऱ्या त्यांच्या 16 वर्षीय मुलाची पुन्हा चौकशी करण्यात आली. त्यात त्यांनी सांगितले की, शनिवार, ४ जून रोजी रात्री तो आईसोबत झोपला होता. पिस्तूल त्याच खोलीच्या कपाटात ठेवले होते. आईच्या उषीखाली असलेली चावी काढून कपाटातून पिस्तूल त्याने काढले. पिस्तुलासोबतच मॅगझिन आणि गोळ्याही होत्या. त्याने यापुर्वी कधी बंदूक चालवली नव्हती. त्यामुळे त्याचा हात थरथरत होता. त्याने पिस्तूल आईच्या उजव्या बाजूला ठेवून डोळे बंद करून ट्रिगर दाबला. त्यावेळी गोळीचा आवाज ऐकून बहीण घाबरून उठली. पण त्याने तिचे तोंड दाबून ठेवले. गोळी लागल्यामुळे आईच्या डोक्यातून रक्ताचा धार वाहू लागल्या. यानंतर तो बहिणीसोबत दुसऱ्या खोलीत गेला आणि या खोलीचा दरवाजा लावून घेतला.
आईला ठार केल्यानंतर तो काही काळजी न करता पार्टी करत राहिला. या दरम्यान त्याने बहिणालीही धमकवेल. मृतदेहाचा वास लपवण्यासाठी तो रुम फ्रेशनर फवारत राहिला. हे रहस्य उघड झाल्यानंतर पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी मुलाला कोणताही पश्चाताप नाही.
काय आहे प्रकरण
लखनऊमधील वृंदावन कॉलनीमध्ये 16 वर्षीय आरोपी, त्याची आई व 10 वर्षीय बहिण राहत असते. त्याचे वडील सैन्यात कार्यरत आहेत. 7 जून रोजी आरोपीने आपल्याच वडिलांच्या बंदूकीने आईची हत्या केली. या बंदुच्या आवाजाने बहिणीला जाग आल्याने आरोपीने धमकी तिलाही दिली. मुलाच्या वडिलांनी पाच दिवसांत 50 कॉल केले. मुलाने वडिलांस फोन लावून एका इलेक्ट्रीशनने आईचा खून केल्याचे सांगितले. वडीलांनी तातडीने साधनाच्या भावास कळविले व त्याने पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पाहताच साधनाचा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचे समजले. तसेच, आरोपीची 10 वर्षीय बहिणही घाबरलेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता आरोपीचा बनाव लक्षात आला.