डोंबिवली ते टिटवाळा 15 मिनिटांत, कल्याण रिंगरोड फेज-4 वाहतुकीसाठी खुला
डोंबिवली ते टिटवाळा या शहरांमधील प्रवास 15 ते 20 मिनिटांत व्हावा यासाठी एमएमआरडीएकडून कल्याण रिंग रोड तयार करण्यात येत आहे. या रिंग रोडमधील एकूण 8 टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. टप्पा चार ते टप्पा सात अशा चार टप्प्यांचे (दुर्गाडी ब्रीज ते एसएच 35- 40 रोड जंक्शन) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
1. फेज-4 (दुर्गाडी पूल ते गांधार पूल), फेज-5 (गांधारी पूल ते मांडा जंक्शन), फेज-6 (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन) आणि फेज-7 (टिटवाळा जंक्शन ते एसएच 35-40 रोड जंक्शन) चे काम 95 टक्के झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
2. फेज-3 (मोठा गाव पूल ते गोविंदवाडी रस्ता) रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे, जे 2026 पर्यंत पूर्ण होईल.
3. फेज-1 (हेडूटेन ते शीळ रोड) आणि फेज-2 (शीळ रोड ते मोगगाव ब्रिज) साठी भूसंपादन सुरू आहे. हे कामही 2026 पर्यंत पूर्ण होईल.
4. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूकही होणार आहे. त्यामुळे शहरी रस्त्यांवर भार पडणार नाही.
प्रकल्पाचे फायदे
1. काटई - टिटवाळा हे एक तासाचे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटांत गाठता येईल.
2. या मार्गावर अवजड वाहनांना सुद्धा परवानगी दिली जाईल यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
3. या प्रकल्पामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सेवा अधिक सोयीस्कर आणि जलद होण्यास मदत होणार आहे.