साताऱ्याच्या कराडमध्ये 15 लाखांची रोकड जप्त

साताऱ्याच्या कराडमध्ये 15 लाखांची रोकड जप्त

साताऱ्याच्या कराडमध्ये 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शशिकांत सूर्यवंशी, कराड

साताऱ्याच्या कराडमध्ये 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. एका खासगी कारमधून 15 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

निवडणूक पथक, तळबीड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून कार गुजरात पासिंगची असून कराडहून साताऱ्याकडे ही कार जात होती अशी माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तासवडे टोलनाक्यावरती तळबीड पोलिसांची विशेष तपासणी मोहीम सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com