नववर्ष स्वागतासाठी 12 विशेष लोकल सेवा

नववर्ष स्वागतासाठी 12 विशेष लोकल सेवा

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. उपनगरांमधून मुंबईत येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी रात्री १२ विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर अप-डाऊन धीम्या मार्गावर प्रत्येकी दोन अशा चार लोकल चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान धीम्या मार्गावर अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी चार अशा आठ स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहेत.

तसेच पश्चिम रेल्वेवर आठ आणि मध्य रेल्वेवर चार विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. उशिरा घरी जाण्यासाठी लोकल उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्याची दखल घेत रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com