परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे.
Published by :
shweta walge
Published on

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले आहेत. इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केला आहे.

शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी 2023-24 मध्ये 50 ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केलीय. ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्की लाभ होईल, असा विश्वास इतर मागास - बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com