H3N2 Virus : चिंता वाढली; राज्यात H3N2 चे 119 रुग्ण
Admin

H3N2 Virus : चिंता वाढली; राज्यात H3N2 चे 119 रुग्ण

कोरोनाने कुठे विश्रांती घेतलेली असताना सर्व नीट सुरू झालेले असताना आता नवीन व्हायरसने एन्ट्री घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोरोनाने कुठे विश्रांती घेतलेली असताना सर्व नीट सुरू झालेले असताना आता नवीन व्हायरसने एन्ट्री घेतली आहे. राज्यात एच3एन2 च्या 119 तर एच1एन1 च्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या रुग्णालयात 73 जणांवर उपचार सुरु आहेत. H3N2 चा धोका पाहता प्रशासन अलर्टवर आहे.

देशातील तिसरा आणि महाराष्ट्रातील पहिल्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा बळी घेतला आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लक्षणे काय आहेत?

ताप येणे

त्वचा उबदार आणि ओलसर होणे

चेहरा लाल होणे

डोळे पाणावणे

सर्दी,

अंगदुखी,

कफ नसलेला खोकला,

डोकेदुखी होणे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com