transport
transport

साताऱ्यातून कोकणात गणेशोत्सवासाठी 115 जादा बसेस

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांमधून आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांच्या दिमतीला सुमारे 115 बसेस धावणार आहेत..
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रशांत जगताप, सातारा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांमधून आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांच्या दिमतीला सुमारे 115 बसेस धावणार आहेत. सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या अकरा आगारातील सुमारे 115 बसेस कोकणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली आहे.

गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे.. त्यामुळे सर्वच आगारातून पुणे आणि मुंबई या ठिकाणी जादा बसे सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा आगरातून सातारा-स्वारगेट मार्गावर रोज 46 फेऱ्या होतात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 30 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच मुंबई आणि बोरिवलीसाठी 20 जागा बसेस सोडल्या जाणार आहेत.

transport
कोरोनात होणाऱ्या मृत्युंमध्ये वाढ की घट? WHOने केला खुलासा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com