Leopards In Junner
Leopard NewsLokshahi

जुन्नर तालुक्यात बिबट्ट्यांचा वावर थांबणार? १० बिबट्यांना जामनगर येथील निवारा केंद्रात सोडलं

जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात आज स्थलांतरित करण्यात आले, अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

साईदीप ढोबळे

Leopards In Junner : जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची समस्या अत्यंत गंभीर बनली असतानाच वन विभागाने आता यांसदर्भात मोठी कार्यवाही केली आहे. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे जामनगर (गुजरात) येथील निवारा केंद्रात आज स्थलांतरित करण्यात आले, अशी माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली आहे.

सातपुते यांनी दिलेली माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून ४ मादी व ६ नर, असे एकूण १० बिबटे जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील 'वनतारा प्राणीसंग्रहालया'त स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती.

हे बिबटे वनखात्याच्या वाहनातून (वातानुकूलित रुग्णवाहिका) नेण्यात आले. गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व मॅनेजमेंट टीमचे सदस्यांनी बिबट्यांच्या स्थलांतराच्या कामात सहभाग घेतला. माणिकडोह व वनविभाग जुन्नरचे १५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने आज दिवसभरात १० बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात चढवण्यात आले.

अमोल सातपुते उपवनसंरक्षक जुन्नर, अमित भिसे, सहायक वनसंरक्षक जुन्नर, प्रदीप चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे १० बिबटे पिंजऱ्यातातून सुरक्षितपणे सोडण्यात आले. बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह २० ते २५ जणांचे गुजरातचे पथक अॅम्ब्युलन्ससोबत असणार आहे. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या अॅम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबटे सुरक्षितरित्या वाहनात चढवण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com