डॉक्टरला 300 रुपयांची लिपस्टिक पडली एक लाखाला; नेमकं प्रकरण काय?

डॉक्टरला 300 रुपयांची लिपस्टिक पडली एक लाखाला; नेमकं प्रकरण काय?

300 रुपयांची लिपस्टिकसाठी महिला डॉक्टरची एक लाखाची फसवणूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

300 रुपयांची लिपस्टिकसाठी महिला डॉक्टरची एक लाखाची फसवणूक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी 300 रुपयांची लिपस्टिक ऑनलाइन ऑर्डर केली. नवी मुंबईत राहणाऱ्या या डॉक्टरने २ नोव्हेंबर रोजी एका ई-कॉमर्स पोर्टलवर लिपस्टिकची ऑर्डर दिली होती.

काही दिवसांनंतर तिला कुरिअर कंपनीकडून एक मेसेज आला की तिची ऑर्डर डिलिव्हरी झाली आहे. मात्र महिलेला लिपीस्टिक न मिळाल्याने तिने कुरिअर कंपनीच्या नंबरवर संपर्क साधला. कस्टमर केअर प्रतिनिधी तिच्याशी संपर्क करेल असे तिला सांगण्यात आले.

डॉक्टरांनी सांगितले की, तिला एक कॉल आला आणि दुसऱ्या व्यक्तीने तिला सांगितले की तिची ऑर्डर होल्डवर ठेवली गेली आहे. त्या व्यक्तीने तिला वेबलिंक पाठवून तिचे बँक तपशील भरण्यास सांगितले. तिने लिंकवर क्लिक करताच तिच्या मोबाईलवर एक अॅप डाउनलोड झाला.

९ नोव्हेंबर रोजी तिच्या बँक खात्यातून ९५,००० आणि ५,००० रुपये डेबिट झाल्याचा संदेश तिला आला. पीडित डॉक्टरनी नेरुळ येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com