International
चीनमध्ये आढळला नवा विषाणू; ‘हे’ शहर लॉकडाऊन
संपूर्ण जगावरील कोरोनाचं संकट आता कूठे ओसरायला लागलेलं असताना चीनमध्ये एक नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे. दरम्यान ह्या विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये ह्याकरीता खबरदारी म्हणून 9 लाख लोकसंख्येच्या चांगचुन येथील ईशान्येकडील औद्योगिक केंद्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतातील कोरोना परिस्थिती देखील पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून देशातील रुग्ण संख्या कमी झाली असून दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालीय आणि अश्यातच ह्या नव्या आलेल्या विषाणूमुळे भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.