NEET PG 2021 | 18 तारखेला होणारी NEET ची परीक्षा ढकलली पुढे
कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे देशात रोज हजारोच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. अनेकांचा मृत्यू होतोय. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा घातक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नसल्याचे अनेकांचा मत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने (NBE) मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच कारणामुळे देशभरात विविध राज्यांतर्गत तसेच राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बऱ्याच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीबीएससी बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. परीक्षेसंदर्भात एवढे सारे निर्णय होत असताना वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांकडूनसुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करुन केंद्राने द्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलली आहे.