NCB पंच किरण गोसावी ८ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच

NCB पंच किरण गोसावी ८ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच

Published by :
Published on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यामध्येच आर्यनसोबतच्या सेल्फीमुळे चर्चेत आलेला पंच किरण गोसावी याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. त्याच्या पोलीस कोठडीत आता 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शिवाजी नगर कोर्टाने आज त्याच्या कोठडीत वाढ केल्याने किरण गोसावीची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

आर्यन खानवरील कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खान सोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली होती. दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आता या कोठडीत वाढ करण्यात आली असून ८ नोव्हेंबरपर्यंत तो तुरुंगातच असणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com