Navneet Kaur| जात प्रमाणपत्राच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

Navneet Kaur| जात प्रमाणपत्राच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

Published by :
Published on

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मागील काही दिवसा पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सुनावणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आक्षेप घेतला होता. यावर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला होता . दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला होता.

नेमकं प्रकरण काय आहे ?

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे. ही निवडणूक त्यांनी जिंकली त्यांनी यावेळी दाखल केलेले. जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप माजी शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ केला होता. यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात नवनीत राणा यांच्या विरोधात निकाल लागल्याने नवनीत राणा यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते त्यावर आज सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com