India
संसदेत गदारोळ, राज्यसभेच्या अध्यक्षांनी TMC च्या खासदारांना केलं निलंबित
पेगासस प्रकरण संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलंच गाजत आहे. पेगासस प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी हे खासदार करत होते. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर लक्ष घालावं अशी देखील मागणी करण्यात आली. यावरुन राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या TMC च्या खासदारांना राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिवसभरासाठी निलंबित केलं आहे.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काही टीएमसी खासदारांना सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यापासून निलंबित केलं आहे. टीएमसी सदस्य डोला सेन, अर्पिता घोष आणि नदीम उल हक यांच्यासह विरोधी पक्षांतील काही सदस्यांनी फलक घेऊन राज्यसभेत मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. पेगासस प्रकरणावर चर्चेची मागणी केली आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी केली.