मुंबईत बुधवारी 2510 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले

मुंबईत बुधवारी 2510 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले

Published by :
Published on

मुंबईत मागील २-३ दिवासांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज बुधवारी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येनी उच्चांक गाठला आहे. मुंबईत आज २ हजार ५१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील मागील काही महिन्यात कोरोना रुग्णांची वाढलेली ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी हीच संख्या १ हजार ३७७ इतकी होती.

जवळपास १ हजारांहून अधिक रुग्ण आज मुंबईत वाढले आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांपासून २५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच मुंबईत आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी देखील मुंबईत एकाच रुग्णाचा मृत्यू झाला होता. मुंबईतील कोरोनाबाधितांचे मृत्यूदर कमी असला तरी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मुंबईत सध्या ८ हजार६० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आज दिवसभरात ५१ हजार ८४३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील २ हजार ५१० कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील सध्या १ सक्रीय कंटेनमेंट झोन आहे. मुंबईतील सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या वाढून ४५ इतकी झाली आहे.

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. मुंबईत मंगळवारी नोंदवण्यात आलेल्या १३७७ रुग्णसंख्येने मुंबई प्रशानसाला जाग आली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत ७० टक्क्यांनी वाढ झाली होती. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी मुंबईला अलर्ट जारी केला आहे. मुंबईत बुधवारपासून २ हजार रुग्ण आढळतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. आदित्य ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईत आज अडीच हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मागील आठवड्याभरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी

29 डिसेंबर – 2510 रुग्ण
28 डिसेंबर – 1377 रूग्ण
27 डिसेंबर – 809 रूग्ण
26 डिसेंबर – 922 रूग्ण
25 डिसेंबर – 757 रूग्ण
24 डिसेंबर – 683 रूग्ण

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com