Monsoon in Kerala | केरळमध्ये मान्सून आज दाखल; तुमच्या राज्यात कधी ते जाणून घ्या…
गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण – पश्चिम मान्सून केरळमध्ये पोहचणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यावर दोन दिवस उशिरानं दाखल होत असला तरी आता येत्या काही तासांत केरळमध्ये रिमझिम पावसाला सुरूवात होऊ शकते असे भारतीय हवामान विज्ञान विभागाचं (IMD) म्हणणं आहे.
उपग्रहाच्या माध्यमातून मिळालेल्या फोटोंतून केरळच्या तटावर आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण – पूर्व अरब सागरात ढग पसरलेले दिसून येत आहेत. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये येत्या २४ तासांत स्थिती मान्सूनसाठी अधिक अनुकूल होण्याचा पूर्वानुमान आहे. केरळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडतोय.
तुमच्या राज्यात कधी दाखल होणार?
केरळ : ३ जून
महाराष्ट्र : ११ जून
तेलंगणा : ११ जून
पश्चिम बंगाल : १२ जून
ओडिशा : १३ जून
झारखंड : १४ जून
बिहार आणि छत्तीसगड : १६ जून
उत्तराखंड – मध्य प्रदेश : २० जून
उत्तर प्रदेश : २३ जून
गुजरात : २६ जून
दिल्ली – हरयाणा : २७ जून
पंजाब : २८ मे
राजस्थान : २९ जून