काँग्रेसच्या महानगर अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय ?

काँग्रेसच्या महानगर अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय ?

Published by :
Published on

अनिल ठाकरे, चंद्रपूर | जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या चंद्रपूर महानगर अध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा (molestation case) दाखल करण्यात आला आहे. पतीसोबत झालेल्या वादाची तक्रार करण्यास गेलेल्या विवाहीत महीलेला आरोपीने महिला तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी (Women's Grievance Redressal Center) असल्याचा बनाव करत तिचे समुपदेशन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. विवाहीत महीलेने या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा (molestation case) दाखल करत कुणाल रामटेके याला अटक केली.

शहरातील भिवापूर वार्डात राहणाऱ्या फिर्यादी महिलेचा पतीसोबत वाद झाला होता.याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात (Women's Grievance Redressal Center) समुपदेशनासाठी महीला गेली होती.फिर्यादी महिलेच्या नातेवाईकामार्फत कुणाल रामटेके यांची ओळख महिलेसोबत झाली. रामटेके यांनी स्वतःला तक्रार निवारण केंद्रातील कर्मचारी असल्याचे त्या महिलेसमोर दर्शविले.आता मी तुमचं समुपदेशन करण्यासाठी येणार असेही सांगितले.

कुणाल रामटेके यांनी महिलेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.तिला व्हाट्सअप्प द्वारे सतत प्रेमाचा आलाप करीत संदेश पाठवीत होता. असे महीलेने तक्रारीत म्हटले आहे.रामटेके यांचं कृत्य आवाक्याबाहेर होताच महिलेने शहर पोलीस स्टेशन गाठले. तक्रार नोंदवली. तक्रारीचा आधारे पोलीसांनी रामटेके याला अटक केली आहे.या प्रकाराने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com