ट्विटरवर मोदीं लोकप्रिय, सर्वाधिक फॉलोअर्स राजकीय नेते
सोशल मीडियावरील ट्विटर या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या ७ कोटींवर गेली असून राजकारणात सक्रीय असलेल्या जगातील नेत्यात सुद्धा मोदी आघाडीवर गेले आहेत.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर ८ कोटी ७० लाख फॉलोअर्स होते पण ट्विटरने ट्रम्प यांचे अकौंट बंद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००९ मध्ये ट्विटरचा वापर सुरु केला आणि ते या माध्यमावर सतत सक्रीय आहेत. २०१० मध्ये त्यांचे १ लाख फॉलोअर होते ती संख्या २०११ मध्ये चार लाखांवर गेली होती.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर १२ लाख ९८ हजार फॉलोअर्स आहेत पण ओबामा आता राजकारणात सक्रीय नाहीत. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे ट्विटरवर ३ कोटी ९ हजार फॉलोअर्स आहेत. भारतात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे ट्विटरवर १ कोटी ९४ लाख तर गृहमंत्री अमित शहा यांचे २ कोटी ६२ लाख फॉलोअर्स आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल याच्या फॉलोअर्सची संख्या २ कोटी २८ लाख आहे.