India
कोरोनाबाबत मोदी सरकारला अतिआत्मविश्वास; राहुल गांधींचा निशाणा
देशात पहिल्यांदाच चार जणांना दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर एका व्यक्तीला ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेन भारतात आल्याची बाब गंभीर आहे. यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, कोरोना अजून संपलेली नाही. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे.