Budget 2022 | मोदी सरकारने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला दिली भन्नाट ऑफर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प असून गेल्यावर्षीसारखे यावर्षी देखिल निर्मला सीतारामन या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प मांडला.
या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या यात अजून एक महत्वाची घोषणा झाली ती म्हणजे देशातील सर्व राज्य सरकारच्या मदतीसाठी केंद्र १ लाख कोटी रुपये दिले जाणार असून ही रक्कम ५० वर्षासाठी बिगर व्याजी असणार आहे.
या वर्षी निर्मला सीतारामन आयकरात सवलत देतील असे वाटले होते. पण टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्के केला त्याच बरोबर कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ वरून ७ टक्क्यांवर आणला आहे. निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचे कर्मचाऱ्यांना नॅशनल पेशन स्कीममधील योगदानावर १४ टक्के पर्यंत कर सवलत दिली आहे.