अल्पसंख्याकांना दुर्बल घटक समजण्यात यावे, सुप्रीम कोर्ट
देशात अल्पसंख्याकांची सध्याची स्थिती बिकट झाली असून या वर्गाला दुर्बल घटक समजण्यात यावे आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने सुप्रीम कोर्टात केली आहे. अल्पसंख्याकांसाठी घटनेने अनेक प्रकारे संरक्षण दिले आहे, त्यांच्या हितासाठी अनेक कायदेही करण्यात आले आहेत, परंतु तरीही अल्पसंख्याकांमध्ये आपल्याला भेदभावाची व असामनतेची वागणूक मिळत आहे अशी भावना आहे असेही या आयोगाने म्हटले आहे.
आयोगाने या संबंधात जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशात बहुसंख्याकांचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे आता अल्पसंख्याकांना दुर्बल घटक समजून त्यांना मदत केली पाहिजे.अल्पसंख्यकांकासाठी विषेश तरतुदी केल्या नाहीत किंवा त्यांच्यासाठी योजना तयार केल्या गेल्या नाहीत तर हा वर्ग दबला जाण्याची शक्यताही यात व्यक्त करण्यात आली आहे. धर्माच्या आधारावर कोणत्याही कल्याणकारी योजना नसाव्यात अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी केंद्र सरकारच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे की, अल्पसंख्याकांसाठी लागू करण्यात आलेल्या योजना कायदेशीरदृष्ट्या वैध आहेत. या योजनांमुळे हिंदु किंवा अन्य कोणत्याही समुदायाच्या हक्कांवर गदा येत नाही असेही केंद्र सरकारने नमूद केले आहे.