सीमेवरील तणाव निवळला : भारत-चीनकडून सैन्य माघारीस सुरुवात

सीमेवरील तणाव निवळला : भारत-चीनकडून सैन्य माघारीस सुरुवात

Published by :
Published on

गेल्या 10 महिन्यांपासून भारतीय भूभागावर कब्जा करून बसलेला चीन अखेर नरमला आहे. चीनने पूर्व लडाखच्या फिंगर 4 आणि 5 परिसरातून माघारी हटण्यास सुरूवात झाली आहे. बुधवारपर्यंत चीन या भागातून पूर्णपणे माघारी परतणार आहे.

गेले 10 महिने पूर्व लडाखच्या भागात घुसखोरी करून बसलेला चिनी ड्रॅगनने अखेर आपला विळखा सैल केला आहे. पूर्व लडाख भागात पँगाँग सरोवराजवळ भारत-चीनी सैन्याची 'डिसएन्गेजमेंट प्रक्रिया' अर्थात सैन्य माघारी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासंदर्भात भारतीय लष्कराकडून अधिकृत व्हिडीओही जारी करण्यात आले आहेत. या व्हिडीओमधून सैन्य माघारी जात असल्याचे स्पष्टपणे दिसते.

चीननं आपल्या लष्करासाठी या भागात अनेक तळ उभारले होते. बंकर्स आणि चौक्याही बांधण्यात आल्या होत्या. या परिसरात चीनने सुमारे 50 हजार सैनिक तैनात करण्यात आले होते, असे सांगितले जात होते. पँकाँग त्सो सरोवर आणि फिंगर 4 आणि 5 परिसरातून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी माघारी परतत आहे. या परिसरातून चीनचे सुमारे 200 टँक्स चीनच्या हद्दीत परतले आहेत. एवढेच नव्हे तर, फिंगर 8पासून पुढे घुसखोरी करत चीनकडून तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेले बांधकामही पाडण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत, पूर्व लडाख भागात भारत – चीनमध्ये सैन्य माघारीबद्दल करार झाल्याचं म्हटले होते. या करारानुसार, चीनची सेना पँगाँक सरोवरच्या फिंगर 8 च्या आपल्या जुन्या जागेवर तर, भारतीय सेनाही फिंगर 3 जवळ आपल्या धनसिंह पोस्टवर परतणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com