तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; बिपीन रावतांचा कुटुंबासोबत प्रवास

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं; बिपीन रावतांचा कुटुंबासोबत प्रवास

Published by :
Published on

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं आहे. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावतदेखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. याबाबत लष्कराकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. १४ पैकी ४ जण अत्यंत अत्यंत गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. दोन मृतदेह आढळून आले आहेत. तर ४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi सीरिज हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह जवळपास १४ जण असल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, आणि रावत यांची पत्नी मधुरीका रावतही या हेलिकॉप्टर मध्ये होते.

दोन मृतदेह ८० टक्के जळालेल्या स्थितीत आढळून आले आहेत. आणखी काही मृतदेह जंगलात दुर्घटनाग्रस्त भागात आढळल्याचं बोललं जातंय. इतर मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच त्यांची ओळख करण्यात येत आहे.

https://twitter.com/IAF_MCC/status/1468494305182371845?s=20
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com