MG Motors|एमजीने आणली भारतातील पहिली पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही
एमजी मोटर इंडियाने आज आगामी मिड साइज एसयूव्ही अॅस्टर (Astor) मध्ये समाविष्ट असलेल्या इंडस्ट्रीतील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल – २ तंत्रज्ञानाचे अनावरण केले. संधी आणि सेवांच्या कार-अॅझ अ प्लॅटफॉर्म (CAAP)च्या संकल्पनेवर आधारीत ऑटो-टेक घटकावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट एमजीने ठेवले आहे.
एमजी सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सारख्या नवोदित तंत्रज्ञानावर काम करत आहे. जेणेकरून ग्राहकांसाठीच्या सेवा आणि सबक्रिप्शनचा विकास तसेच कार्यान्वयन होईल. त्यासोबतच त्यांच्या 'ऑन-डिमांड इन-कार' गरजा पूर्ण करता येतील. कंपनीच्या जागतिक पोर्टफोलिओत पर्सनल एआय असिस्टंट मिळालेली अॅस्टर ही पहिलीच कार आहे.
पर्सनल एआय असिस्टंट हे प्रसिद्ध अमेरिकन फर्म 'स्टार डिझाइन'ने तयार केले आहे. यात मानवासारख्या भावना आणि आवाज काढले जातात. तसेच विकिपीडियाद्वारे प्रत्येक विषयावर तपशीलवार माहिती मिळते. हे तंत्रज्ञान कारमधील लोकांशी जोडले जाईल. त्यात आय-स्मार्ट हबची सुविधाही आहे. या प्लॅटफॉर्मवर CAAP च्या पार्टनरशिप, सेवा आणि सबक्रिप्शन असेल. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या सेवांचा समूह पर्सनलाइज करण्याची संधी मिळेल.