PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून बेपत्ता

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून बेपत्ता

Published by :
Published on

पंजाब नॅशनल बँकेच्या १४००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा मूळचे सूत्रधार असलेल्या मेहुल चोक्सीने अॅंटिग्वा पोलीसांच्या हातावर तुरी देऊन अॅंटिग्वामधून पळ काढल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिले आहे. चोक्सीची शोध मोहीम सुरु असून तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आणखी एक आरोपी नीरव मोदी याचे प्रत्यार्पण अंतिम टप्प्यात असताना मेहुल चोक्सीने पलायन केल्यानं केंद्र सरकारला झटका बसला आहे. चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरु होती. त्याचा अंदाज घेत चोक्सीने अॅंटिग्वामधून पलायन केल्याचे बोलले जात आहे. अॅंटिग्वाबरोबरच इतर कॅरेबियन देशांचे सुद्धा चोक्सीकडे नागरिकत्व असल्याचा संशय आहे. त्यामळेच तो कॅरेबियन बेटांवर मुक्त संचार करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com