लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक
कोरोनाच्या संसर्गामुळे अद्यापही सर्वांसाठी राज्यातील लोकल सेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही. मात्र, दोन डोस झालेल्या लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. अशातच पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात हार्बर लाईनवर देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मेन लाईनवर दिवा-ठाणे दरम्यान १० तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
त्यामुळे आता लोकल सेवा पूर्वीप्रमाणे सुरु झाली आहे. असे असताना आता मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि सांताक्रुज दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावर दिवा ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी १० तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक परिचालीत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉग असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, हार्बर लाईनवर देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठीआज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.