रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
येत्या रविवारी (Sunday) म्हणजेच 13 मार्च 2022 ला पश्चिम, मध्य व हार्बर अशा तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे (Railway) मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ (SantaCruz) ते गोरेगाव (Goregaon) दरम्यान सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पाच तासांचा जंबो मेगाब्लॉक असणार असून. या दरम्यान धिम्या मार्गावरील सर्व गाड्या या जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. धिम्या मार्गावरील गाड्या वळवण्यात आल्यामुळे गाड्या उशीराने धावण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे मार्गावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे (Thane) कल्याण (Kalyan) अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (Mumbai) येथून सकाळी 8.16 ते सायंकाळी 4.17 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद लोकल या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर थांबवल्या जातील. या सेवा त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. तसेच कल्याण येथून सकाळी 8.40 ते सायंकाळी 4.58 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.