‘मुंबईत दिवसाला दोन ते अडीच लाख लोकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट’
आतापर्यंत मुंबईत ३५ लाखांवरील लोकांचं पूर्ण झालं आहे. आगामी काळात दिवसाला २ ते अडीच लाखांच्या लसीकरणाचं आमचं उद्दिष्ट आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या. कोरोनाला हरवण्यासाठी मुंबई सज्ज झाली असल्याची प्रतिक्रियाही यावेळी त्यांनी दिली.
लसीकरणासाठी पूर्ण नियोजन केलं जाणार आहे. फर्स्ट कम फर्स्टनुसार लस दिली जाणार आहे. लसीचा किती साठा आहे याची माहिती बोर्डावर लावली जाईल. वाद टाळण्यासाठी नियोजन करणार आहोत, असंही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांशी बोलत आहेत. नागरिकांची भीती दूर करण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत, असंही महापौर यांनी सांगितलं.
मुंबईतील ३७ ठिकाणी लसीकरण सुरूच आहे. घरात जाऊन लस देण्याचा अद्याप विचार नाही. वस्ती पातळीवर जाऊन लस देण्याचा विचार करत आहोत. मात्र, लसीकरणासाठी नोंदणी करणं गरजेची आहे. अॅपच्या माध्यमातूनच लसीकरण केलं जाणार आहे. या काळात सर्वांचंचं सहकार्य अपेक्षित आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत गरजेची आहे. नोंदणीनुसार नावं आलं तरच लसीकरणासाठी घराबाहेर पडा, असं आवाहनसुद्धा पेडणेकर यांनी केलं.