बेकायदेशीर धर्मांतरणासाठी हवाल्यामार्फंत फंडिंग, मौलाना सिद्दीकीला ATS कडून अटक
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात मौलाना कलीम सिद्दीकीला उत्तर प्रदेशातील ATS कडून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी सिद्दकी हा ग्लोबल पीस सेंटर आणि जमीयत -ए-वलीउल्लाह संस्थेचा अध्यक्ष आहे. नागरिकांचे बेकायदेशीर धर्मांतर केल्या प्रकरणी त्याला उत्तर प्रदेश एटीएस पथकाने मेरठमधून ताब्यात घेतले आहे. या धर्मांतरणाच्या रॅकेट प्रकरणी यापूर्वी मुफ्ती काजी आणि उमर गौतम या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींचे मौलाना कलीम सिद्दकीसह संबंध असल्याचे उघड झाले आहे. परदेशातून कोट्यावधी रुपये सिद्दकीच्या बँक खात्यात येत असल्याचे आरोप करण्यात आहेत. बेकायदेशीर धर्मांतरणासाठी परदेशातून हवाल्यामार्फंत फंडिंग करत असल्याचे आरोपही सिद्दकीवर ठेवण्यात आले आहे.
सिद्दीकीला हवाल्यामार्फत परदेशातून फडिंग
उत्तर प्रदेश एटीएसने यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एटीएसने, बेकायदेशीर धर्मांतरणासाठी मौलाना कलीम सिद्दीकी हवाल्यामार्फत परदेशातून फडिंग गोळा करत असल्याचे सांगितले आहेत. मौलाना सिद्दीकी सध्या एटीएसच्या ताब्यात असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. मौलाना कलीम यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना बेकायदेशीर धर्मांतरणासाठी आणि धर्मांतर रॅकेटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत होता. यानेच बॉलिवूड अभिनेत्री सना खान हिचे लग्न लावून दिले होते.