”एक दिवस नव्हे, वर्षातील सर्व दिवस मराठी भाषा दिन साजरा व्हावा”

”एक दिवस नव्हे, वर्षातील सर्व दिवस मराठी भाषा दिन साजरा व्हावा”

Published by :
Published on

अमोल धर्माधिकारी | राज्यात उद्या २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा दिवस' साजरा केला जाणार आहे. यानिमित्त एका कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिन केवळ एक दिवस साजरा न करता वर्षातील सर्व दिवस मराठी भाषा दिन साजरा व्हावा" असे प्रतिपादन केले आहे.

२७ फेब्रुवारी रोजी मराठी साहित्याचा मानदंड साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. साहित्यिक वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 'मराठी भाषा दिवस' साजरा केला जातो. पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार आज 'दीपावली' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राज ठाकरे यांनी मराठी भाषेवरून जोरदार भाषण केलय.

याप्रसंगी ते म्हणाले, मराठी साहित्य आणि साहित्यिकांची परंपरा खूप दीर्घ आणि समृद्ध आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन केवळ एक दिवस साजरा न करता मराठी साहित्यात योगदान दिलेल्या सर्व साहित्यिकांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करावा, एवढ्या साहित्यिकांची मांदियाळी मराठी साहित्य विश्वात आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com