ममता बॅनर्जींकडून बंगालच्या जनतेचा विश्वासघात, पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विविध पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या बंगालमधील या पहिल्या प्रचारसभेसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली होती. ब्रिगेड परेड ग्राऊंडमधून त्यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं. पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला.
"बंगालने परिवर्तनासाठी ममता दीदींवर विश्वास टाकला होता. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंगालचा विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. येत्या निवडणुकीत तुम्हाला परिवर्तन करण्याची संधी आहे. तेव्हा यावेळी आपण 'जोर से छाप, TMC साफ'असे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतादीदींवर जोरदार शरसंधान साधलं.
बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केलं. मुलींवर अत्याचार केले," अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ममता सरकारवर टीका केली.