Yass Cyclone | पंतप्रधानांच्या बैठकीत सहभागी होण्यास ममता बॅनर्जींचा नकार
यास या चक्रीवादळाने पूर्व किनारपट्टीला तडाखा दिला. ओडिसा, पश्चिम बंगालसह अन्य राज्यांतही यास चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीचे हवाई सर्वेक्षण केले. तसेच राज्यांत झालेले नुकसान आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकही घेत आहेत. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकाल दिला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित केल्याने ममता बॅनर्जी नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कालीकुंडा येथील आढावा बैठकीमध्ये सहभागी होण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. कालीकुंडा येथील बैठकीत यास चक्रीवादळात झालेले नुकसान आणि अन्य माहितीची कागपत्रे घेऊन ममता बॅनर्जी जाणार असल्याचे समजते. ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयामुळे राज्य आणि केंद्रातील तणाव वाढू शकतो .